Saturday, July 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारी! हे लेझर डिव्हाईस हवेतच करणार कोविड विषाणूचा खात्मा

भारी! हे लेझर डिव्हाईस हवेतच करणार कोविड विषाणूचा खात्मा

संशोधकांनी एक असं डिव्हाइस म्हणजे उपकरण तयार केलं आहे ज्यातील लेझर किरण हवेतील (Coronavirus) कोविड-19 विषाणूसह इतर घातक बॅक्टेरियांचा खात्मा करून टाकतात

  • Trending Desk
  • Last Updated: Jul 6, 2021 06:50 AM IST

रोम, 6 जुलै:  जगात सर्वत्र कोविड-19 विषाणूविरुद्धचा लढा (Coronavirus Pandemic) सुरूच आहे. काही लसी तयार झाल्या (Corona Vaccine)त्या नागरिकांना दिल्या गेल्या आणि नागरिक सुरक्षित झाले. तेवढ्यात विषाणूची नवनवी रूपं तयार झाली आणि त्यांना रोखण्यासाठी लसींवर संशोधन सुरू झालं. याबरोबरच अनेक कंपन्यांनी कोरोना विषाणूला मारणारी औषधं (Corona Medicines) तयार केली. त्यांच परिणामकारकता तपासली गेली. पण आता इटलीतील एका कंपनीने (Italian Company laser device against coronavirus) आणि संयुक्त राष्ट्राच्या संशोधकांनी एक असं डिव्हाइस म्हणजे उपकरण तयार केलं आहे ज्यातील लेझर किरण हवेतील कोविड-19 विषाणूसह इतर घातक बॅक्टेरियांचा खात्मा करून टाकतात. गेल्या वर्षापासूनच या शास्रज्ञांनी असं उपकरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल SBI च्या ताज्या अहवालात माहिती

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्‍नॉलॉजीच्या (ICGEB) कार्डियोव्हॅस्कुलर बायोलॉजी ग्रुपच्या प्रमुख सेरेना जकिन्या म्हणाल्या, ‘ हे उपकरण (Laser Device)तयार झाल्यावर माझं लेझर या किरणांबद्दलचं मतंच बदललं. या उपकरणानी 50 मिलीसेकंदांत विषाणूला मारून टाकलं. आम्ही या उपकरणासाठी इटलीतील एल्टेक कंपनीच्या लेझर विभागाशी करार केला आहे. या कंपनीचे संस्थापक फ्रेंचेस्को जनाटा आहेत. ही कंपनी वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी लेझर उपकरणं तयार करते. ’

या उपकरणाबद्दल जर्नल ऑफ फोटोकेमेस्‍ट्री अँड फोटोबायोलॉजीमधील एका लेखात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या लेखानुसार या लेझरमुळे माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता वाढू शकते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हा लेख प्रसिद्ध झाला असून त्याच्या लेखकाचं म्हणणं आहे की कोरोना विषाणूला (Covid-19 Virus) संपवण्याचं हे तंत्रज्ञान माणसासाठी सुरक्षित नाही. तरीही जनाटा आणि जाकिन्या यांनी असा कुठला लेख लिहिला गेल्याचं अमान्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या उपकरणातून निघणारे लेझर किरण माणसाच्या शरीराच्या संपर्कात कधीच येत नाहीत. त्यामुळे माणसाला कॅन्सर होण्याची शक्यताच नाही. हे उपकरण माणसाच्या वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असून ते रिसायकल प्रॉडक्ट आहे असा दावाही या दोघांनी केला आहे.

10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा

जरी हे उपकरण फायदेशीर दिसत असलं तरीही त्यात काही त्रुटीही आहेत. शास्रज्ञांच्या मते हे उपकरण केवळ हवेतील कोविड विषाणूंच मारू शकतं जमीन किंवा इतर कुठल्या पृष्ठभागावर विषाणू असतील तर हे उपकरण तिथं कामच करू शकत नाही. एखादी व्यक्ती शिंकली तरीही हे उपकरण त्यातील विषाणू मारण्यात सक्षम नाही. कंपनीला या उपकरणाचं पेटंट मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे उपकरण लाँच करण्याचा कंपनीचा मनोदय आहे. उपकरण वापरण्यासाठी अधिक सोयीचं आहे.

हे उपकरण सहा फूट उंच आहे आणि त्याचं वजन 25 किलो आहे. एअरकंडिशनिंग युनिटमध्येही हे उपकरण बसवता येतं. जर्मनीतील लसींची तपासणी करणारी कंपनी इकोकेअरने या उपकरणाचा वापर करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. युएईतल्या बाजारात हे उपकरण विकण्याचं लायसन्स मिळवण्याचा या जर्मन कंपनीचा मनोदय आहे.

First published: July 6, 2021, 6:50 AM IST

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments