Home » आंतरराष्ट्रीय » कर्मचाऱ्याचा ‘बादली भरून’ पगार, मालकाने वैतागून दिलं अजब सरप्राईज

कर्मचाऱ्याचा ‘बादली भरून’ पगार, मालकाने वैतागून दिलं अजब सरप्राईज

कर्मचाऱ्याचा-‘बादली-भरून’-पगार,-मालकाने-वैतागून-दिलं-अजब-सरप्राईज

एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्याला बादलीतून पगार (Salary in bucket) दिल्याच्या घटनेची सोशल मीडियात जोरदार (Social media viral) चर्चा रंगली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 17 सप्टेंबर : कुठल्याही कंपनीत बॉस आणि कर्मचारी यांचं नातं (Boss and Employee relationship) कसं असतं, ते सर्वांनाच माहिती असतं. बहुतांश ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांच्या चुका काढण्यात आणि त्यांना अधिक काम करायला सांगण्यात बॉस पटाईत असतात. तर आपला बॉस कसा मठ्ठ आहे, हे सिद्ध करण्याची एकही संधी कर्मचारी सहसा सोडत नाही. बॉस आणि एम्प्लॉयी नात्यातील अशीच एक अजब घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना आहे बादलीतून दिलेल्या पगाराची (Salary in tub) पगारासाठी तगादा गेल्या काही दिवसांपासून एका कर्मचाऱ्याने पगारासाठी त्याच्या बॉसकडे तगादा लावला होता. अनेक दिवसांपासून पगार न झाल्यामुळे चिंतेत असलेला हा कर्मचारी आपला पगार द्यावा, अशी विनंती सतत,येताजाता त्याच्या बॉसला करत असे. एक दिवस बॉसने त्याला केबिनमध्ये बोलावलं आणि त्याच्या हातात एक वस्तू दिली. ती वस्तू म्हणजे पांढऱ्या रंगाची एक बादली होती. त्या बादलीत नाणी भरली होती आणि त्यांच्या वजनाने बादली चांगलीच जड झाली होती.

  If anyone wants to know what it was like to work in alfies on south william street just know after chasing my last pay for weeks I finally got it but in a bucket of 5c coins. pic.twitter.com/otKhikIU5q

  — Rian Keogh (@rianjkeogh) September 14, 2021

  हाच पगार कर्मचाऱ्याने आश्चर्यचकित होत, त्याविषयी विचारलं. त्यावर हाच तुझा पगार आहे, असं उत्तर बॉसनं दिलं. दर महिन्याला बँक खात्यात जमा होणारा पगार यावेळी बादलीत कसा काय जमा झाला, असा प्रश्न कर्मचाऱ्याला पडला. त्याच्या पगाराच्या रकमेइतकीच नाणी त्याच्या बॉसने एका बादलीत भरली आणि ती बादली पगार म्हणून कर्मचाऱ्याला दिली. एवढी वजनदार बादली उचलून घरी जाताना त्याला अक्षरशः घाम फुटला आणि आपली नोकरी ‘जड पगाराची’ असल्याची मजादेखील वाटली. हॉटेल कर्मचाऱ्याने ट्विट केला फोटो आयर्लंडमधील डब्लिन शहरात राहणाऱ्या रियाननं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्या मालकानं पाहा आपल्याला कसा पगार दिला, असं म्हणत त्यानं ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed