Home » Uncategorized » तालिबानी सत्तेमुळे अल् कायदा ACTIVE, अमेरिकेला पुन्हा हल्ल्याची भीती

तालिबानी सत्तेमुळे अल् कायदा ACTIVE, अमेरिकेला पुन्हा हल्ल्याची भीती

तालिबानी-सत्तेमुळे-अल्-कायदा-active,-अमेरिकेला-पुन्हा-हल्ल्याची-भीती

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यामुळे पुन्हा एकदा अल् कायदा (Al Quida) ही दहशतवादी संघटना सक्रीय (Active) होऊ लागल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी (US intelligence officer) दिली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  काबुल, 15 सप्टेंबर : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यामुळे पुन्हा एकदा अल् कायदा (Al Quida) ही दहशतवादी संघटना सक्रीय (Active) होऊ लागल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी (US intelligence officer) दिली आहे. तालिबान आणि अल् कायदा यांचे घनिष्ट संबंध असून आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा अल् कायदाचे दहशतवादी यायला सुरुवात झाल्याची माहिती असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख ले.जनरल स्कॉट बेरियर यांनी यांनी पुन्हा एकदा अल् कायदा सक्रीय झाल्याची माहिती दिली आहे. पुढील एक ते दोन वर्षात अल् कायदा अमेरिकेवर हल्ला करण्याइतपत ताकदवान होऊ शकते, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानमधील अल् कायदाच्या दहशतवाद्यांचा अगोदरच पत्ता लागला असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याचं सीआयएचे उपसंचालक डेव्हिड कोहेन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेवर अल् कायदा नेमका कधी हल्ला करेल, हे आत्ताच सांगणं कठीण असलं तरी पुढील काही वर्षात या संघटनेची पाळंमुळं तालिबानच्या मदतीनं चांगलीच घट्ट रोवली जाऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. इतर देशांपासूनही धोका अमेरिकेचे सैनिक गेली 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये असल्यामुळे तिथून अल् कायदाचे सर्व दहशतवादी पळून  गेले होते. त्यामुळे सध्या तरी अफगाणिस्तानमध्ये येऊन बस्तान बसवायला त्यांना वेळ लागू शकतो. मात्र सध्या येमेन, सोमालिया, सीरिया आणि इराक या देशांमध्ये अल् कायदाचे दहशतवादी लपलेले असू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा – या बेटावर आहेत फक्त प्रेतं आणि कवट्या, जिवंत माणसांना NO ENTRY; पाहा PHOTOs व्हिडिओतून कमांडरची ओळख पटली अल् कायदाचा सीनिअर कमांडर अमीन उल-हक या अफगाणिस्तानमध्ये परतल्याचं सांगितलं जात आहे. अमीर उल-हक हा ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता. तो स्वतः गाडी चालवत तालिबानच्या चेक-पोस्टवरून पुढे जात असल्याचं या व्हिडिओत दिसतं. तिथं उपस्थित असलेल्यांशी हस्तांदोलन करत आणि अभिवादन करत तो अफगाणिस्तानमध्ये दाखल झाल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

  Published by:desk news

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *