Home » आंतरराष्ट्रीय » नवविवाहित महिलांनी 1 वर्षासाठी प्रेग्नंसी पुढं ढकलावी; या सरकारचा अजब-गजब निर्णय

नवविवाहित महिलांनी 1 वर्षासाठी प्रेग्नंसी पुढं ढकलावी; या सरकारचा अजब-गजब निर्णय

नवविवाहित-महिलांनी-1-वर्षासाठी-प्रेग्नंसी-पुढं-ढकलावी;-या-सरकारचा-अजब-गजब-निर्णय

गेल्या काही महिन्यांत येथे सुमारे 40 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं हा सल्ला दिला आहे. यापूर्वी झिका विषाणूमुळं महाराष्ट्रातही महिलांना असाच सल्ला देण्यात आला होता.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  कोलंबो, 12 सप्टेंबर : जगात कोरोना विषाणूचा कहर अजून कायम आहे. आपले शेजारील राष्ट्र श्रीलंकेत कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटची (delta variants risks sri lanka) अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ज्यामुळे लंकेत खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा धोका टाळण्यासाठी श्रीलंका सरकारने नवविवाहित महिलांना गर्भधारणा काही काळ पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांत येथे सुमारे 40 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं हा सल्ला दिला आहे. यापूर्वी झिका विषाणूमुळं महाराष्ट्रातही महिलांना असाच सल्ला देण्यात आला होता. सरकारवर टीका अशाप्रकारे श्रीलंकेतील (corona in sri lanka ) आरोग्य मंत्रालयानं हा सल्ला दिल्यानंतर सरकारवर अनेकांनी टीका केली आहे. त्यानंतर देशाचे प्राथमिक आरोग्य सेवा, महामारी आणि कोविड रोग नियंत्रण मंत्री डॉ. सुदर्शनानी फर्नांडपुले म्हणाले की, कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या सल्ल्यानुसारच आम्ही याबाबत सल्ला देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, या सल्ल्यामध्ये महिलांना आई आणि मूल दोघांच्या सुरक्षिततेसाठी एक वर्षासाठी गर्भधारणा थांबवण्यास सांगितले होते. आरोग्य मंत्री म्हणाले की, कोरोनाचा हा नवीन प्रकार सुरुवातीच्या विषाणूपेक्षा अधिक प्राणघातक आहे आणि वेगाने पसरत आहे. त्यामुळे हा सल्ला योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आरोग्य कार्यक्रम ब्युरोचे संचालक म्हणाले … सरकारच्या आरोग्य कार्यक्रम ब्युरोच्या संचालिका चित्रामाली डी. सिल्वा म्हणाल्या, ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रारंभापासून सुमारे 41 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळंच आम्ही नव्याने विवाहित जोडपी आणि इतरांनाही या बिकट स्थितीत किमान एक वर्ष कोविड -19 चा धोका टाळण्यासाठी कुटुंब नियोजन पद्धती वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा – पावसाचा जोर, कोयना धरणाचे सहा दरवाजे खुले होणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लॉकडाऊन पुन्हा लागू होऊ शकतो आतापर्यंत देशात 5500 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 70 टक्के महिलांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. तज्ज्ञांनी गर्भवती महिलांना लस घेण्याचा सल्ला दिला आहे. देशात ऑगस्टपासून कोरोना लॉकडाऊन नियमांमध्ये बरीच शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, सरकारकडून लवकरच नवीन निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत कठोर निर्बंधांची शिफारस केली आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed