Home » आंतरराष्ट्रीय » भयंकर ! अमेरिकेतील शाळांमध्ये कोरोनाचा कहर, साडेसात लाख मुलांना लागण

भयंकर ! अमेरिकेतील शाळांमध्ये कोरोनाचा कहर, साडेसात लाख मुलांना लागण

भयंकर-!-अमेरिकेतील-शाळांमध्ये-कोरोनाचा-कहर,-साडेसात-लाख-मुलांना-लागण

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव कायम असतानाच काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतही शाळांना सुरूवात झाली आहे. पण हा निर्णय सध्या चांगलाच महाग पडल्याचं दिसत आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 10 सप्टेंबर : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव कायम असतानाच काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतही शाळांना सुरूवात झाली आहे. पण हा निर्णय सध्या चांगलाच महाग पडल्याचं दिसत आहे. कारण, शाळा सुरू होताच कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अडीच लाख मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरात साडेसात लाख मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या अहवालानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अडीच लाखांपेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून मुलांच्या उपचाराचा एका आठवड्यातील हा सर्वोच्च आकडा आहे. मागच्या आठवड्यापेक्षा यामध्ये 10 टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेत या आठभरात एकूण दहा लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी मुलांची संख्या ही 25 टक्के आहे. कोरोनाग्रस्त मुलांची संख्या वाढल्यानं हॉस्पिटलमध्ये ताण वाढू लागला आहे. अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेन्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान साडे सात लाख मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तालिबान करणार पाकिस्तानी चलनाचा स्वीकार, पाक सरकार अफगाणिस्तानला पाठवणार टीम या रिपोर्टनुसार अमेरिकेतील 50 लाख मुलांना आजवर कोरोनाची लागण झाली असून यापैकी 444 जणांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण पाच पट वाढलं आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. जून ते ऑगस्ट या महिन्याच्या काळात चार वर्षांपेक्षा कमी वय आणि 12 ते वयोगटातील मुलांचे प्रमाण हे 10 पटीनं जास्त आहे, अशी माहिती या रिपोर्टमधून स्पष्ट झाली आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.