निर्दयी तालिबान, मुलांसमोरच केली सैनिकाची गोळी घालून हत्या

पुन्हा एकदा तालिबानच्या क्रूरतेचं एक उदाहरण समोर आलं आहे.
- Maharashtra Maza News
- Last Updated :
काबूल, 11 सप्टेंबर: तालिबाननं (Taliban)अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. आता पुन्हा एकदा तालिबानच्या क्रूरतेचं एक उदाहरण समोर आलं आहे. माफी मागूनही तालिबान लढाऊंनी अफगाण सैन्याचा भाग असलेल्या एका सैनिकाला घरातून बाहेर काढून ठार केलं. धक्कादायक म्हणजे तालिबानच्या लढाऊंनी ही हत्या जवानाच्या कुटुंबीयांसमोरच केली आहे. यावेळी त्यांची मुलंही तिथेचं उपस्थित होती. घोरबन महंमद अंद्राबी हे अफगाण सैन्याचे सैनिक होते. तालिबान्यांनी त्याला माफ केलं होतं. असं असतानाही बुधवारी, दक्षिण अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतातील खानजान भागात राहणाऱ्या अंद्राबी यांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं आणि त्यांना गोळ्या घालून ठार केलं. माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या भावाची तालिबानकडून हत्या अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या भावाची (Brother) तालिबाननं (Taliban) हत्या (Murder) केली आहे. त्याचा गळा चिरून आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. मुंबई पालिकेनं फक्त पाच महिन्यात बुजवले हजारो खड्डे, आखलं नवं धोरण अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी नेहमीच तालिबानला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी आपणच अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. पंजशीरमधून ते तालिबानविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर आता त्यांचे भाऊ रोहुल्लाह सालेह यांची तालिबानकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Published by:Maharashtra Maza News
First published: