Home » आंतरराष्ट्रीय » काश्मीर अभी बाकी है! तालिबानच्या विजयी घोषणेनंतर अल कायदाचं मोठं विधान, म्हणाले.

काश्मीर अभी बाकी है! तालिबानच्या विजयी घोषणेनंतर अल कायदाचं मोठं विधान, म्हणाले.

काश्मीर-अभी-बाकी-है!-तालिबानच्या-विजयी-घोषणेनंतर-अल-कायदाचं-मोठं-विधान,-म्हणाले.

अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल तालिबानला शुभेच्छा देताना अल कायदानं काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे.

Afghanistan Crisis: काबूल विमानतळ सोडून अमेरिकनं सैन्य निघून गेल्यानंतर तालिबाननं विजयी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आतंकवादी संघटना अल कायदानं तालिबानला शुभेच्छा (Al Qaeda congratulates Taliban) दिल्या आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  काबूल, 01 सप्टेंबर: अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर (American troops went back) आता तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवला आहे. यानंतर आता काबूल विमानतळ सोडून अमेरिकनं सैन्य निघून गेल्यानंतर तालिबाननं विजयी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आतंकवादी संघटना अल कायदानं तालिबानला शुभेच्छा (Al Qaeda congratulates Taliban) दिल्या आहेत. त्याचबरोबर शत्रूंच्या ताब्यात असणाऱ्या मुस्लीम बहुल प्रदेश मुक्त करण्याचं आव्हानही यावेळी करण्यात आलं आहे. तालिबाननं अफगाणिस्तावर पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर काही तासांतचं अल कायदानं ही घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अफगाणिस्तानसह आसपासच्या प्रदेशात काय स्थिती असेल, याबाबत चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल तालिबानला दिलेल्या शुभेच्छा संदेशात अल-कायदानं (Al Qaeda statement on kashmir) म्हटलं की, काश्मीर आणि इतर तथाकथित इस्लामिक भूमींना ‘इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून मुक्त’ करणं गरजेचं आहे. यामध्ये अल कायदानं पॅलेस्टाईन, लेवंत, सोमालिया आणि येमेनच्या मुक्तीबद्दलही बोललं आहे. अल कायदानं तालिबानला लिहिलेल्या संदेशात म्हटलं की, ‘हे अल्लाह, लेवंत, सोमालिया, काश्मीर आणि इतर इस्लामिक भूमी इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून मुक्त कर. हे अल्लाह, जगभरातील मुस्लिम कैद्यांना स्वातंत्र्य दे.’ हेही वाचा-तालिबानने गायकाला घरातून ओढत बाहेर आणले, डोक्यात गोळी घालून केली हत्या अल कायदाच्या या घोषणेनंतर काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण अलीकडेचं दोन तीन दिवसांपूर्ण तालिबानचा म्होरक्या शेर मोहम्मद स्टॅनिकझाई यांनी म्हटलं होतं. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत मुद्दा आहे. यामध्ये तालिबानला किंवा अफगाणिस्तानला खेचण्याचा प्रयत्न करू नये. दोन्ही देशांनी आपसात तो प्रश्न मार्गी लावावा. आम्हाला शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध आवश्यक आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. हेही वाचा-तालिबान्यांची ही POSITIVE बाब तुम्हाला दिसलीच नाही, आफ्रिदीनं तोडले अकलेचे तारे फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक शांतता करार झाला होता. या करारात म्हटलं होतं की, अमेरिकन सैन्य वापसी झाल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबान संघटना जगातील अन्य दहशतवादी गटांशी सर्व संबंध संपुष्टात आणेल. खास करून अल कायदाशी. मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध मॉनिटरिंग टीमनं जारी केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, तालिबाननं अल-कायदाशी संबंध तोडल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed