Home » आंतरराष्ट्रीय » भारताला मोठा धक्का; मेहुल चोक्सीला डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मंजूर

भारताला मोठा धक्का; मेहुल चोक्सीला डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मंजूर

भारताला-मोठा-धक्का;-मेहुल-चोक्सीला-डोमिनिका-हायकोर्टाकडून-जामीन-मंजूर

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान ही बातमी समोर आली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 12, 2021 10:07 PM IST

डोमिनिका, 12 जुलै : देशातील (India) पंजाब नॅशनल बँकेचं (Punjab National Bank) 13 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी (Diamantaire) मेहुल चोक्सी (Mehul Choksi)ला डोमिनिका हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मेहुल चोक्सीने आरोग्याचं कारण सांगून डोमिनिका कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी कोर्टाने मेहुल चोक्सी याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

मेहुल चोक्सी प्रवास करण्यासाठी फिट असल्याचं जोपर्यंत दिसून येत नाही, तोपर्यत त्याला जामीन देण्यात आला. सुनावणीनंतर आता तो डोमिनिकाला परतणार आहे. यापूर्वी मेहुल चोक्सीने न्युरोलॉजिकल आजाराने ग्रस्त असणे आणि यावरील आजार डोमिनिकामध्ये उलब्ध नसल्याच्या आधारावर जामीन याचिकेवर लवकर सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. याशिवाय त्याने या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याचा आग्रह केला होता. जो हायकोर्टाने स्वीकारला होता. यापूर्वी या याचिकेवर 23 जुलै रोजी सुनावणी होणार होती. (Mehul Choksi granted bail by Dominica High Court )

हे ही वाचा-योगी बाबाचा हायप्रोफाइल फ्रॉड, ज्वेलर्सच्या पत्नीला घालत होता असा गंडा

चोक्सीनं स्वतःच रचला अपहरणाचा कट

Dominica High Court allows fugitive diamantaire Mehul Choksi to return to Antigua on bail for treatment: Local media

— Press Trust of India (@PTI_News) July 12, 2021

मेहुल चोक्सी (Mehul Choksi)सध्या त्याच्या कथित अपहरण (Kidnapping) नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटीग्वामधून (Antigua) डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीनं आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारनं जबरदस्तीनं डोमिनिकाला (Dominica) नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचं त्यानं स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली आहे. सीएनएन-न्यूज 18 ला त्यांनी ही माहिती दिली असून या प्रकरणात चोक्सीला मदत करणाऱ्या एका फरारी एजंटचे फोटोही सीएनएन-न्यूज 18 ला मिळाले आहेत. या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचं अँटीग्वा पोलिसांनी सांगितलं आहे.

ही व्यक्ती चोक्सीला समुद्रमार्गे क्युबाला (Cuba) घेऊन जाणार होती. पण डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आल्यानं त्यांचा हा डाव फसल्याचं पोलीस चौकशी दरम्यान सिद्ध झालं आहे. अँटिग्वा सोडून क्युबामध्ये स्थायिक होण्याची चोक्सीची योजना असल्याचं तसंच चोक्सीकडं अँटिग्वा आणि बार्बुडासह आणखी एका कॅरेबियन देशाचे नागरिकत्व असल्याची माहिती अँटिग्वामधील चोक्सीचा जवळचा मित्र गोविन (Govin) यानं पोलिसांना दिली.

Published by: Meenal Gangurde

First published: July 12, 2021, 10:05 PM IST

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.