Home » आंतरराष्ट्रीय » चीनमुळे आणखी एका खतरनाक आजाराची उत्पत्ती; लँग्या व्हायरसबाबत धक्कादायक माहिती

चीनमुळे आणखी एका खतरनाक आजाराची उत्पत्ती; लँग्या व्हायरसबाबत धक्कादायक माहिती

चीनमुळे-आणखी-एका-खतरनाक-आजाराची-उत्पत्ती;-लँग्या-व्हायरसबाबत-धक्कादायक-माहिती

चीनमध्ये सध्या थैमान घालणारा लँग्या हा नवा व्हायरस माणसांमध्ये कसा आला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  बीजिंग, 10 ऑगस्ट : कोरोनाव्हायरस नेमका कुठून आला हे अद्याप माहिती नाही. याबाबत वेगवेगळ्या थिएरी आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते हा व्हायरस वटवाघळातून आला तर काहींच्या मते हा व्हायरस लॅबमधून लीक झाला. पण सर्वात आधी चीनमध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला आणि त्यानंतर तो जगभर पसरला. त्यामुळे चीनलाच कोरोना महासाथीसाठी जबाबदार धरलं जात आहे. आता याच चीनमुळे आणखी एका खतरनाक व्हायरसची उत्पत्ती झाली आहे. हा व्हायरस म्हणजे लँग्या व्हायरस. कोरोनानंतर चीनमध्ये आता लँग्या व्हायरस थैमान घालतो आहे. चीनच्या काही शहरात या व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. प्राण्यांमार्फत हा आजार माणसांमध्ये पसरला आहे. हा आजार नेमका कुठून आणि कसा आला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्हायरस उंदरांमुळे माणसांत आल्याचं सांगितलं जातं आहे. उंदराचं मांस खाल्ल्याने हा व्हायरस माणसांच्या शरीरात गेला आहे. आता कोरोनासारखा हा व्हायरस माणसामाणसांत पसरतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे वाचा – 4 वर्षांमध्ये फक्त मादी कासवांचाच जन्म, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर, संशोधक झाले परेशान! चीनमध्ये लँग्या व्हायरसचे आतापर्यंत 35 रुग्ण आढळले आहेत. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितानुसार शेडोंग आणि हेनान प्रांतात हे रुग्ण सापडले आहेत. याबाबत लोकांना अलर्ट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार तैवान सीडीसेचे चुआंग जेन सियांग ताइपे टाइम्सशी बोलताना सांगितलं की, आतापर्यंत दोन टक्के बकरी, 5 टक्के श्वान आणि इतर काही प्राणी या व्हायरसचे पॉझिटिव्ह आहेत.  हा व्हायरस प्राण्यांमार्फत माणसांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. हे वाचा – अनेक राज्यांमध्ये डायरियाचा उद्रेक, आजार होऊ नये यासाठी ‘या’ गोष्टी टाळा या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये  ताप, थकवा, खोकला, भूक कमी लागणं, स्नायूंमध्ये त्रास, डोकेदुखी, उलटी अशी लक्षणं दिसतात. तसंच पांढऱ्या रक्तपेशी कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

  Published by:Priya Lad

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: China, Health, Lifestyle, Virus

  Leave a Reply

  Your email address will not be published.