Home » आंतरराष्ट्रीय » ना बेबी बम्प, ना प्रेग्न्सीचं लक्षण; फक्त पोटात वेदना झाल्या आणि जन्माला आलं बाळ

ना बेबी बम्प, ना प्रेग्न्सीचं लक्षण; फक्त पोटात वेदना झाल्या आणि जन्माला आलं बाळ

ना-बेबी-बम्प,-ना-प्रेग्न्सीचं-लक्षण;-फक्त-पोटात-वेदना-झाल्या-आणि-जन्माला-आलं-बाळ

20 वर्षांच्या तरुणीला पोटातील वेदना पीरिअड पेन वाटलं पण खरंतर ते लेबर पेन होतं.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  लंडन, 28 जून : प्रेग्नन्सी म्हटलं की मासिक पाळी चुकणं, मळमळणं, उलटी होणं अशी लक्षणं सुरुवातीला दिसतात. काही आठवड्यांनी पोटाचा आकार वाढतो आणि बेबी बम्प दिसू लागतं. पण एका तरुणीच्या बाबतीत प्रेग्नन्सीची अशी कोणतीच लक्ष न दिसता तिने अचानक बाळाला जन्म दिला आहे. पोटात होणाऱ्या वेदनांना तिने पीरिअड्स पेन समजलं. त्यासाठी ती टॉयलेटमध्ये गेली आणि तिथंच तिचं बाळ जन्माला आलं आणि तिला धक्काच बसला (Baby born without pregnancy symptoms). जेस डेव्हिस साऊथेम्प्टन युनिव्हर्सिटीत विद्यार्थिनी आहे.  ज्या दिवशी तिने आपल्या बाळाला जन्म दिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा 20 वा वाढदिवस होता. तिने हाऊस पार्टी प्लॅन केली होती आणि त्याचीच तयारी ती करत होती. तेव्हा अचानक तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या आणि ती टॉयलेटमध्ये गेली. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार जेसने सांगितलं, जसे मी टॉयलेट सीटवर बसले तेव्हा पोटातून काहीतरी बाहेर येत असल्याचं मला वाटलं आणि मला पुश करावंसं वाटलं. त्यानंतर मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला.  तेव्हा मी स्वप्न पाहते आहे, असंच वाटू लागलं. आई होण्याचा हा अनुभव माझ्यासाठी कोणत्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. हे वाचा – मृत्यूनंतरही आईचा मृतदेह देऊ शकते बाळाला जन्म; डेडबॉडीसंबंधित या बाबी हैराण करतील! प्रेग्नन्सीबाबत मला काहीच माहिती नव्हतं. ना बेबी बम्प आलं आणि इतर कोणतं लक्षणं दिसलं.  माझी मासिक पाळी नेहमी अनियमित होती, त्यामुळे पीरिअड्स चुकल्यानंतर मी फार लक्ष दिलं नाही. माझ्या पोटात तीव्र वेदना झाला आणि  मासिक पाळीमुळेच वेदना होत असाव्यात असं मला वाटलं. त्यानंतर मी माझ्या मित्राला फोन करून मला बाळ झाल्याचं सांगितलं, तेव्हा त्यानेही मजेत घेतलं. वाढदिवसाची पार्टी न देण्यासाठी मी बाळाचा कारण देत असल्याचं त्याला वाटलं. त्यानंतर मी त्यांना फोटो पाठवला आणि मला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करायला बोलावलं. तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. अॅम्ब्युलन्स घेऊन तो माझ्या घरी आला. हे वाचा – 4 वेळा जुळी, 5 वेळा तिळं अन् 5 वेळा एकाच वेळी 4 मुलं! महिलेनं चाळिशीपर्यंत दिला 44 मुलांना जन्म आई आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांहितलं. बाळाचं वजन तीन किलो आहे. 35 व्या हे बाळ जन्माला आलं.

  Published by:Priya Lad

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Girl pregnant, Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman

  Leave a Reply

  Your email address will not be published.