Home » आंतरराष्ट्रीय » बापरे! हे काय? शिंकताच मुलाच्या नाकातून बाहेर पडलं असं काही; पाहून कुटुंबही शॉक

बापरे! हे काय? शिंकताच मुलाच्या नाकातून बाहेर पडलं असं काही; पाहून कुटुंबही शॉक

बापरे!-हे-काय?-शिंकताच-मुलाच्या-नाकातून-बाहेर-पडलं-असं-काही;-पाहून-कुटुंबही-शॉक

लंडन, 25 जून : शिंकल्यानंतर नाकातून सर्दी बाहेर पडते पण त्याऐवजी दुसरंच काही बाहेर पडलं तर… असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका 14 वर्षीय मुलाच्या नाकातून असं काही बाहेर पडलं ते पाहून तो शॉक झाला. त्याच्या कुटुंबालाही धक्का बसलं. आपल्या नाकातून असं काही बाहेर पडेल, याचा विचारही या मुलाने केला नव्हता. यूकेतील ही घटना आहे (Coin stuck in boys nose came out after sneeze). यूकेमध्ये राहणारा 14 वर्षांचा उमेर कमर आपल्या कुटुंबासोबत बसला होता. त्यानंतर त्याच्या नाकात तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यामुळे नाक दाबत तिथून उठून तो बाजूला गेला. त्याने आपल्या दोन्ही कानात कापूस टाकला. त्यानंतर एका नाकापुडीतून श्वास रोखला आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडला. त्यानंतर त्याला जोरात शिंक आली आणि त्याने विचारही केला नाही अशी वस्तू नाकातून बाहेर पडली. हे वाचा – VIDEO – Principal कडून Female teacher ला चपलेने मारहाण; संतापजनक कृत्यामागे धक्कादायक कारण त्याच्या नाकातून बाहेर आलं ते म्हणजे एक नाणं उमेर 4 वर्षांचा असताना त्याच्या नाकात पैशांचं नाणं अडकलं होतं. तो याबाबत विसरूनही गेला होता. ते त्याच्या लक्षातच नव्हतं. शिवाय त्याच्या आईलाही याची माहिती नव्हती. त्यामुळे तिलाही यावर विश्वास बसत नव्हता. त्याची आई नफसीनने सांगितलं की, आमच्यासमोर नाक दाबून तो गेला तो 15 मिनिटांनंतर आला. काही वेळ तो उभा राहिला आणि त्याने आपल्या हातातील नाणं दाखवलं. हे नाणं आपल्या नाकातून बाहेर आल्याचं त्याने सांगितलं. उमेर नाकात दुखापत होत असल्याने किती तरी वेळा डॉक्टरकडे गेला पण डॉक्टरांना त्याच्या नाकात अडकेल्या नाण्याबाबत काहीच समजलं नाही. तब्बल 10 वर्षांनंतर त्याच्या नाकातून नाणं बाहेर आल्यावर त्याला आराम वाटला. हे वाचा – Smartwatch ने FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? VIRAL VIDEO मधील दावा किती खरा? आज तकने द सनच्या रिपोर्टचा हवाला दिलेल्या वृत्तानुसार लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमधील डॉ. क्लेअर हॉपकिन्स यांनी सांगितलं, लहान मुलांना आपल्या नाकात काही ना काही टाकण्याची सवय असते. या मुलाने नाकात टाकलेलं नाणं नाकाच्या आत जाऊन अडकलं असेल. अशा घटना बरेच लोक विसरून जातात.

Published by:Priya Lad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Health, Lifestyle, Uk

Leave a Reply

Your email address will not be published.