Home » आंतरराष्ट्रीय » व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दिसली घातक वस्तू; X-ray पाहून डॉक्टरही शॉक

व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दिसली घातक वस्तू; X-ray पाहून डॉक्टरही शॉक

व्यक्तीच्या-प्रायव्हेट-पार्टमध्ये-दिसली-घातक-वस्तू;-x-ray-पाहून-डॉक्टरही-शॉक

कराची 12 जून : पाकिस्तानातून डॉक्टरांच्या एका टीमने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून इलेक्ट्रिक केबल काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार या व्यक्तीने जाणूनबुजून स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 18 सेमी केबल टाकल्याने घडला (Electric Cable Stuck in Private Part). काही दिवसांपासून लघवी करण्यास त्रास होत असल्याने त्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगण्यात आलं . कुठे अंघोळ न करता झोपल्यास तुरुंगवास, तर कुठे हसण्यावरही बंदी; या देशांमध्ये आहेत अतिशय विचित्र कायदे ही घटना पाकिस्तानातील कराची येथील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. या व्यक्तीला काही काळापासून लघवीची समस्या होती. ही समस्या दूर करण्यासाठी त्याने आपल्या मूत्रमार्गात 18 सेमी लांबीची वायर घातली, परंतु ती आत अडकली. या घटनेनंतर त्या व्यक्तीला कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेव्हा या व्यक्तीला वेदना जाणवू लागल्या तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. तिथे त्याची तपासणी करून एक्स-रे काढण्यात आला. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी अडकल्याचं डॉक्टरांनी पाहिलं. डॉक्टरांनी एक्स-रे पाहिल्यावर त्यांनाही धक्का बसला. या व्यक्तीवर तातडीने शस्त्रक्रिया करून ही वायर काढण्यात आली. डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की यात या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकत होता. मोमोज खात असाल तर सावधान! क्षणभरात व्यक्तीने गमावला जीव, डॉक्टरांनी दिला हा सल्ला एखाद्या व्यक्तीने असं कृत्य केल्याची ही पहिलीच घटना नाही. काही काळापूर्वी ब्राझीलमधून अशीच एक घटना समोर आली होती, ज्यात डॉक्टरांच्या टीमने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून व्यायाम करण्यासाठी वापरला जाणारा डंबेल काढला होता. या व्यक्तीने हे दोन किलोचं डंबेल जाणूनबुजून आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं होतं. लैंगिक सुखासाठी त्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगण्यात आलेलं.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: PRIVATE part, Shocking news

Leave a Reply

Your email address will not be published.