Home » आंतरराष्ट्रीय » कारगिल युद्धाचे मास्टरमाईंड PAK चे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचं निधन!

कारगिल युद्धाचे मास्टरमाईंड PAK चे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचं निधन!

कारगिल-युद्धाचे-मास्टरमाईंड-pak-चे-माजी-राष्ट्राध्यक्ष-मुशर्रफ-यांचं-निधन!

नवी दिल्ली, 10 जून : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती शुक्रवारी चिंताजनक झाली. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. मात्र, GNN या टीव्ही चॅनलने दावा केला आहे की, परवेझ मुशर्रफ यांना हृदय आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना दुबईमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या आजाराशी झुंज देत असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. 78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत आहेत. त्यांचं राजकीय आयुष्य पूर्णपणे वादग्रस्त राहिलं आहे. चला त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ. सुनावली होती फाशीची शिक्षा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली. परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. शिक्षा कोणत्या प्रकरणात आणि केव्हा झाली? हा खटला 2007 मध्ये राज्यघटनेचे निलंबन आणि देशात आणीबाणी लादण्याशी संबंधित आहे जो दंडनीय गुन्हा आहे. 2014 मध्ये या प्रकरणात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते. न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली तर अन्य न्यायाधीशांचे मत वेगळे होते. पाकिस्तानच्या माजी लष्करी हुकूमशहाने 3 नोव्हेंबर 2007 रोजी राज्यघटना निलंबित करून आणीबाणी जाहीर केली. नंतर, जेव्हा पीएमएल-एन सरकार सत्तेवर आले, तेव्हा डिसेंबर 2013 मध्ये मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. 31 मार्च 2014 रोजी या प्रकरणातील आरोप निश्चित करण्यात आले आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये फिर्यादी पक्षाने विशेष न्यायालयात सर्व पुरावे सादर केले. दरम्यान, 2016 मध्ये मुशर्रफ यांनी काही आठवड्यांत पाकिस्तानला परतणार असल्याचे सांगत उपचारासाठी देश सोडला होता. मुशर्रफ शेवटपर्यंत दुबईतच राहिले. कोण आहेत परवेझ मुशर्रफ? कारगिल युद्धाच्या वेळी जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते. कारगिलबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अंधारात ठेवल्याचे मानले जाते. नवाझ शरीफ श्रीलंकेत असताना 1999 मध्ये मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केला होता. नंतर त्यांनी स्वतःला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले.

Pervez Musharraf death: संजय दत्तच्या ‘त्या’ फोटोमुळे उडाली होती खळबळ; पहिल्यांदा समोर आली होती मुशर्रफ यांची अवस्था

परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केव्हा केला? 12 ऑक्टोबर 1999 रोजी पाकिस्तानात लष्करी उठाव झाला. या रक्तहीन क्रांतीमध्ये श्रीलंकेतून मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करून दहशतवाद पसरवल्याचा आरोप झाल्यानंतर नवाझ यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना कुटुंबातील 40 सदस्यांसह सौदी अरेबियाला पाठवण्यात आले. 1997 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ विजयी झाले आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले. नवाझ शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. नवाझ शरीफ यांना सत्तेवरून हटवून मुशर्रफ यांनी पदभार स्वीकारला जनरल परवेझ मुशर्रफ श्रीलंकेत असताना नवाझ शरीफ यांनी संशयाच्या आधारावर लष्करप्रमुख मुशर्रफ यांना पदावरून हटवण्यात आले. शरीफ यांनी मुशर्रफ यांच्या जागी जनरल अझीझ यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. येथे नवाझ यांनी चूक केली आणि जनरल अझीझ हेही परवेझ मुशर्रफ यांच्याशी एकनिष्ठ होते हे समजू शकले नाही. अखेर ज्या लष्करी उठावाची शरीफ यांना भीती होती ती घडलीच. मुशर्रफ यांनी नवाझ आणि त्यांच्या मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकले जनरल परवेज मुशर्रफ यांनी श्रीलंकेतून परतताच नवाझ शरीफ सरकार उलथून टाकले. इतकेच नाही तर मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ आणि त्यांच्या मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकले आणि स्वत:ला लष्करी शासक म्हणून घोषित केले. यानंतर मुशर्रफ यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. 2000 मध्ये अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या हस्तक्षेपानंतर नवाझ यांना देशातून हाकलण्यात आले होते.

Prophet Remark: इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची माघार, भारत दौऱ्यावर येताच ‘तो’ मजकूर डिलिट

पाकिस्तानने दिला धोका 1998 मध्ये भारतात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, कारगिल युद्धाच्या अवघ्या वर्षभरापूर्वी, मे महिन्यात पोखरणमध्ये अणुचाचण्या घेण्यात आल्या, त्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण अटलजी हे शांतताप्रिय व्यक्ती होते. त्यांनी प्रतिकूल वातावरणाचे मैत्रीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि लाहोरला बसने प्रवास केला जेथे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. तसं पाहिलं तर, त्यावेळी पाकिस्तानातील प्रत्येक राजकारण्याने अटलजींच्या या भूमिकेचं कौतुक केलं, पण दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात बसलेले लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना हे सगळं आवडत नव्हतं. मुशर्रफ यांची नाराजी तेव्हाच समोर आली जेव्हा मुशर्रफ यांनी भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतावेळी प्रोटोकॉलचे उल्लंघन करून अटलजींना अभिवादन केले नाही. एकीकडे अटलजी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ लाहोर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करत होते आणि दुसरीकडे मुशर्रफ कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी करत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.