Home » आंतरराष्ट्रीय » पुन्हा टेन्शन..! 11 देशांमध्ये Monkeypox चा शिरकाव, रुग्णांचा आकडा वाढतोय

पुन्हा टेन्शन..! 11 देशांमध्ये Monkeypox चा शिरकाव, रुग्णांचा आकडा वाढतोय

पुन्हा-टेन्शन.!-11-देशांमध्ये-monkeypox-चा-शिरकाव,-रुग्णांचा-आकडा-वाढतोय

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य – Shutterstock)

Monkeypox: कोरोनाचं (Corona Virus) सावट कायम असतानाच ‘मंकीपॉक्स’ (Monkeypox) या आजाराची चाहूल जगाला लागली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 22 मे: कोरोनाचं (Corona Virus) सावट कायम असतानाच ‘मंकीपॉक्स’ (Monkeypox) या आजाराची चाहूल जगाला लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 11 देशांमध्ये मंकीपॉक्स रोगाच्या 80 प्रकरणांची पुष्टी केली आहे. WHO नं म्हटलं की, संघटना सध्या उद्रेक होण्याचे प्रमाण आणि कारण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काम करत आहे. तसंच या विषाणूची आणखी अनेक प्रकरणे सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर कोरियामध्ये आणखी 2.20 लाख लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या हा देश कोरोना महामारीच्या लाटेशी झुंज देत आहे. असा असेल PM मोदींचा 40 तासांचा जपान दौरा, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल या संदर्भात तातडीच्या बैठकीनंतर डब्ल्यूएचओने सांगितले की, हा विषाणू अनेक देशांतील काही प्राण्यांमध्ये आहे, स्थानिक लोक आणि प्रवाशांमध्ये अधूनमधून उद्रेक होतो. WHO आणि त्याचे भागीदार मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावावर गांभीर्याने काम करत आहेत. अलीकडेच 11 देशांमध्ये नोंदवलेले उद्रेक असामान्य आहेत, कारण ते स्थानिक नसलेल्या देशांमध्ये होत आहेत. आतापर्यंत 80 प्रकरणांची पुष्टी झाली आहे तर 50 तपास प्रलंबित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटन, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन आणि काही युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स वेगाने पसरत आहे. कोविडचा प्रसार कमी करण्याच्या प्रगतीचा दावा किम जोंग यांनी केला आहे. उत्तर कोरियाने शनिवारी सांगितले की सुमारे 2 लाख 20 हजार लोकांना तापाची लक्षणे आहेत. त्याच वेळी, त्यांचे नेते किम जोंग-उन यांनी कोविड -19 चा प्रसार कमी करण्याच्या प्रगतीचा दावा केला आहे. देशातील 2.6 कोटी लोकसंख्येने अँटी-कोविड-19 लसीचा डोस घेतलेला नाही. कोरोना विषाणूच्या या प्रसारामुळे जगातील सर्वात वाईट आरोग्य व्यवस्था असलेल्या गरीब आणि अलिप्त देशातील भीषण परिस्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. Vastu: आर्थिक तंगी घरात कधीच नाही होणार; वास्तुदोष घालवण्यासाठी ही एक गोष्ट घरात कायम ठेवा  तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, उत्तर कोरिया संसर्गाच्या प्रसाराचे खरे प्रमाण कमी लेखत आहे. गेल्या 24 तासांत उत्तर कोरियामध्ये सुमारे 2,19,030 लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत. सलग पाचव्या दिवशी तापाच्या रुग्णांमध्ये सुमारे 2,00,000 रुग्णांची वाढ झाली आहे. उत्तर कोरियाचे म्हणणे आहे की देशात 2.4 दशलक्षाहून अधिक लोक आजारी पडले आहेत आणि 66 लोकांचा मृत्यू अज्ञात तापामुळे झाला आहे. मंकीपॉक्स म्हणजे काय? मंकीपॉक्स हा एक विषाणू (Virus) आहे. स्मॉल पॉक्स व्हायरस फॅमिलीमध्ये याचा समावेश होतो. ज्याची लागण झाल्यामुळे ताप (Fever) येऊन अंगावर विचित्र झुबकेदार पुरळ (Bumpy Rash) दिसू लागतात. सहसा सौम्य समजल्या जाणाऱ्या या विषाणूचे दोन मुख्य स्ट्रेन आहेत. पहिला म्हणजे काँगो स्ट्रेन (Congo Strain) आणि दुसरा वेस्ट आफ्रिकन स्ट्रेन (West African Strain). यापैकी काँगो स्ट्रेन हा अधिक गंभीर आहे. या स्ट्रेनमधील (Fatality Rate) मृत्यूदर 10 टक्क्यांपर्यंत आहे. तर, वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनमधील मृत्यूदर 1 टक्क्यांच्या आसपास आहे. ब्रिटनमध्ये आढळलेले रुग्ण हे वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनचे आहेत. ‘आतापर्यंच्या अभ्यासातून असं निदर्शनास आलं आहे की, आफ्रिका खंड वगळता बाहेर याची खूप कमी प्रकरणं नोंदवली गेली होती. आतापर्यंत फक्त आठ वेळा या प्रकराचे रूग्ण आढळले आहेत. ही अतिशय असामान्य गोष्ट आहे,’ अशी माहिती लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (London School of Hygiene and Tropical Medicine) येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य (International Public Health) विषयाचे प्राध्यापक जिमी व्हिटवर्थ (Jimmy Whitworth) यांनी रॉयटर्सला दिली आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Corona, Coronavirus

  Leave a Reply

  Your email address will not be published.