Home » आंतरराष्ट्रीय » तरुणीला पाण्याची अ‍ॅलर्जी; पिताच होतात उलट्या अन् अंघोळ केल्यावर भयंकर अवस्था

तरुणीला पाण्याची अ‍ॅलर्जी; पिताच होतात उलट्या अन् अंघोळ केल्यावर भयंकर अवस्था

तरुणीला-पाण्याची-अ‍ॅलर्जी;-पिताच-होतात-उलट्या-अन्-अंघोळ-केल्यावर-भयंकर-अवस्था

नवी दिल्ली 12 मे : जगात विविध प्रकारचे लोक आहेत आणि यातील अनेकजण निरनिराळ्या शारीरिक समस्यांचा (Weird Medical Condition) सामना करत असतात. काही समस्या सहजपणे मॅनेज करता येतात, परंतु काही इतक्या कठीण असतात की त्या माणसाचं दैनंदिन जीवनही नरकाप्रमाणे बनवतात. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीचीही अशीच समस्या आहे. एबिगेल बेक नावाच्या या मुलीला पाण्याची अ‍ॅलर्जी आहे (Girl Allergic to Water). यामुळे ती नीट पाणी पिऊही शकत नाही आणि अंघोळही करू शकत नाही. ऑगस्टमध्ये अचानक 20 लाख लोक होणार गायब! Time traveller चा खळबळजनक दावा असं म्हटलं जातं, की माणसासाठी पाणी आणि हवा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विचार करा, जर एखाद्याला यापैकी एका गोष्टीची अॅलर्जी असेल तर किती त्रास होईल? टक्सन येथील रहिवासी असलेल्या एबिगेल बेक हिलाही अशीच अॅलर्जी आहे, ज्याला एक्वाजेनिक अर्टिकेरिया (aquagenic urticaria) म्हणतात. हा सामान्य आजार नाही. तो जगभरातील 200 दशलक्ष लोकांमध्ये एखाद्यालाच ही विचित्र अॅलर्जी असते. जेव्हा एबिगेल 13 वर्षांची होती तेव्हाच या विचित्र आजाराची लक्षणं तिला जाणवू लागली होती. परंतु गेल्या महिन्यातच डॉक्टरांनी तिला अॅक्वाजेनिक अर्टिकेरिया असल्याची पुष्टी दिली. एबिगेलच्या म्हणण्यानुसार, पाण्यात अंघोळ करताच त्वचेवर अॅसिडसारखं काहीतरी पडल्याचं तिला जाणवतं. यामुळेच ती दोन दिवसांतून एकदाच अंघोळ करते. पाणी प्यायल्यानंतरही तिला उलट्या होतात. गेल्या वर्षभरात तिने एक ग्लासही पाणी प्यायलं नसेल. त्याऐवजी ती एनर्जी ड्रिंक्स किंवा डाळिंबाचा रस पिते. गरज पडल्यास ती थोडंसं पाणी एखाद्या वेळी पिते. याशिवाय, डॉक्टर तिला रिहायड्रेटिंग गोळ्या देतात. ‘बॉडी स्प्रे’च्या वासामुळे अल्पवयीन मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू? डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही मुलगी सामान्य लोकांप्रमाणे रडूही शकत नाही, कारण अश्रूंमुळेही तिच्या त्वचेवर जळजळ होऊ लागते. ती लहान असताना तिला या गोष्टीचा थोडाफार त्रास व्हायचा, पण नंतर हा त्रास वाढतच गेला. अंगावर पाणी पडताच तिला अंगावर अॅसिड पडल्यासारखी जळजळ होऊ लागली. सुरुवातीला डॉक्टरांनाही तिची अॅलर्जी समजू शकली नाही आणि अनेकांना ही मस्करी वाटायची. मात्र, आता एबिगेलही आपल्या या आजाराबद्दल उघडपणे बोलते आणि लोकांना याबद्दल समजवण्याचा प्रयत्न करते.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Rare disease, Water

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed