Home » आंतरराष्ट्रीय » VIDEO: हवामान बदलाचा परिणाम? काही क्षणातच पाण्यासोबत पाहून गेलं 3 कोटीचं घर

VIDEO: हवामान बदलाचा परिणाम? काही क्षणातच पाण्यासोबत पाहून गेलं 3 कोटीचं घर

video:-हवामान-बदलाचा-परिणाम?-काही-क्षणातच-पाण्यासोबत-पाहून-गेलं-3-कोटीचं-घर

नवी दिल्ली 13 मे : आतापर्यंत हवामान बदलाच्या (Climate Change) गोष्टींबद्दल आपले डोळे उघडले नसतील, तर आपण आपल्या आजूबाजूला पाहणं खूप गरजेचं झालं आहे. पृथ्वी कशी धोक्यात आहे आणि निसर्गाचं बदललेलं रूप मानवासाठी किती धोकादायक ठरू शकतं, हे समजून घेणं आवश्यक आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना बीचवर एक बीच हाऊस समुद्राच्या लाटांनी ज्या प्रकारे उद्ध्वस्त केलं, त्याचा व्हिडिओ (Beach House Collapse Video) पाहिल्यानंतर तुम्हालाही या सगळ्याची कल्पना येईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार चालवताना अचानक बेशुद्ध झाली महिला; गाडी आपोआप रस्त्यावर धावू लागली अन्.., थरारक घटनेचा VIDEO अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 10 मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे घर पडताना दिसत आहे. घराचा खालचा भाग उखडून गेल्यानंतर लाटांसोबत हे घर वाहून जाताना दिसतं. हे घर रिकामं होतं आणि Hatteras बेटाच्या बाहेरील किनाऱ्यावर बांधलं गेलं होतं. हे घर काही क्षणातच लाटांसोबत वाहून गेलं.

Cape Hatteras National Seashore (Seashore) has confirmed that an unoccupied house at 24265 Ocean Drive, Rodanthe, N.C. collapsed this afternoon. This is the second unoccupied house collapse of the day at the Seashore. Read more: https://t.co/ZPUiklQAWA pic.twitter.com/OMoPNCpbzk

— Cape Hatteras National Seashore (@CapeHatterasNPS) May 10, 2022

यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकार्‍यांनी व्हिडिओ शेअर केला आहे आणि माहिती दिली आहे, की एकाच दिवसात अशाप्रकारे लाटांसोबत वाहून जाणारं हे दुसरं बीच हाउस आहे. घर कोसळण्याच्या काही सेकंद आधीच व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असून लाटांमुळे घर पडल्याची घटना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सध्या हा परिसर लोकांसाठी बंद करण्यात आला आहे, मात्र वादळामुळे तिथे उपस्थित असलेल्या आणखी 9 घरांना धोका निर्माण झाला आहे. डान्स करण्यासाठी महिलेला हात पकडून स्टेजवर खेचलं अन्…; लग्नातच पाहुण्यांची तुफान हाणामारी, Video Viral डेली स्टारच्या वृत्तानुसार, या घटनेत जे घर उद्ध्वस्त झालं, त्याची किंमत £308,000 म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 2 कोटी 92 लाख रुपये आहे. या परिसरात 15 फूट उंचीच्या लाटा उसळत आहेत, ज्यामुळे समोरील सीहाऊस उद्ध्वस्त होत आहेत. हे धोकादायक फुटेज पाहिल्यानंतर लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने म्हटलं की प्राधिकरणाने घरं वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर दुसर्‍या यूजरने लिहिलं – अशा घरांचं बांधकाम करणाऱ्यांना पैसे मिळू नयेत आणि त्यामुळे घरांना विमाही मिळू नये. अनेकांनी हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.