अवतार 2 रिलीज होण्याआधीच हिट; ओपनिंग डेला इतके करोड कमावण्याची शक्यता

अवतार-2-रिलीज-होण्याआधीच-हिट;-ओपनिंग-डेला-इतके-करोड-कमावण्याची-शक्यता

मुंबई, 16 डिसेंबर : जगभरातील प्रेक्षक मागच्या काही महिन्यांपासून एका सिनेमाची आतूरतेनं वाट पाहत होते तो सिनेमा म्हणजे ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’. हा सिनेमा अखेर आज 16 डिसेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. 2009साली आलेल्या ‘अवतार’चा ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा सिक्वेल आहे. पहिल्या ‘अवतार’ला संपूर्ण जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता त्याच्या सिक्वेलची ही प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’च्या रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांनी एडवान्स बुकिंग करत उत्साह दाखवला होता. गुरूवारी ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’साठी 30 करोडचं एडवान्स बुकींग झालं होतं. बॉक्स ऑफिसवर ‘अवतार 2’ नवा इतिहास निर्माण करेल यात काही शंका नाही. शनिवारी आणि रविवारसाठी देखील मोठ्या प्रमाणात एडवान्स बुकींग करण्यात आलं आहे. ‘अवतार 2’ हा आतापर्यंतचा जगातील सर्वात महागडं बजेट असलेला सिनेमा आहे.

अवतार 2 भारतात केवळ एडवान्स बुकींगवर जवळपास 40-50 करोडची कमाई करण्याची शक्यता आहे. देशातील आतापर्यंतची सर्वाधिक एडवान्स बुकींग करणाऱ्या एवजेर्स सिनेमाला देखील अवतार 2 मागे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवतार 2 हा सिनेमा भारतात हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे तमिळ, तेलूगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही सिनेमा पाहायला मिळणार आहे. देशभरात सिनेमासाठी 3800हून अधिक स्क्रिन्स लावण्यात आले आहेत. दरदिवशी सिनेमाचे 17000 हून अधिक शो लावण्यात आले आहेत.

हेही वाचा – जेम्स कॅमेरूननं ओटीटीवर ‘अवतार’ पुन्हा का केला रिलीज? चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी केली जय्यत तयारी

सिनेमाचं ओपनिंग डेलाच बंपर कमाई केली आहे. सिनेमाची एकूण एडवान्स बुकींग पाहता सिनेमा देशातील सगळ्या भाषांमध्ये जवळपास 30-35 करोड रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. तर अमेरिकी मीडियानुसार, अवतार 2 वर्ल्डवाइड ओपनिंग डेला 17 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 140 करोड रुपयाची कमाई करू शकतो.

‘अवतार 2’ हा सिनेमात उत्तर भारतात तसंच दक्षिण भारतातही ऐतिहासिक कमाई करू शकतं म्हलं जात आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सच्या एवेजर्सनी दक्षिण भारतात 100 करोडहून अधिक कमाई केली होती. अवतार 2 चं एडवान्स बुकींग पाहता सिनेमा रेकॉर्ड तोड कमाई करेल अशी शक्यता आहे. खास करून हैद्राबाद, बंगळुरी, विजयवाडा, कोयम्बतूर, कुरनूल, तिरुपती सारख्या शहरात सिनेमा सर्वाधिक कमाई करेल अशी शक्यता आहे.

अवतार 2ची फॅन फॉलोविंग सर्वाधिक आहे. सिनेमात सर्वाधिक कमाई ही मोठ्या शहरात आणि मल्टीप्लेक्समध्ये होईल. त्यातही दिल्ली-एनसीआर, मुंबई, चंदीगड, हैद्राबाद सारख्या शहरात सिनेमात कमाई करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *