'अरे..हे काय चाललयं मुंबईत'; उर्फीच्या धिंगाण्यांवर संतापल्या चित्रा वाघ

'अरे.हे-काय-चाललयं-मुंबईत';-उर्फीच्या-धिंगाण्यांवर-संतापल्या-चित्रा-वाघ

मुंबई,  31 डिसेंबर : बिग बॉस फेम उर्फी जावेदनं वर्षभर तिच्या चित्र विचित्र कपड्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फॅशनच्या नावाखाली सुरू असलेल्या विचित्र कपड्यांचा फॅशनला लोकांनी अनेक वेळा ट्रोल केलं मात्र उर्फीचा हा खेळ काही थांबायचं नाव घेत नाही. अनेकांनी तिला विरोध केला मात्र परिस्थिती जैसे थेआहे. मात्र भाजपकडून आता उर्फीला थेट पोलिसांत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीला तात्काळ बेड्या ठोका म्हणत संपात व्यक्त केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ नेहमीच महिलांच्या प्रश्नांवर आपली मतं मांडत आली आहेत. मुंबईत महिलांवर होणारे अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणिती असोत त्या नेहमी आपली परखड मत मांडत असतात. एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे सोशल मीडियावर बिनधास्त कपड्यांचा बाजार मांडणाऱ्या उर्फीवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Urfi Javed : सुजलेला चेहरा अन् डोळ्यांखाली काळी वर्तुळे; उर्फी जावेदची अवस्था वाईट, नक्की काय झालं?

चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, शी… अरे काय चाललंय मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिराणी उत्तानरपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPCआहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.

उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती. बिग बॉस व्यतिरिक्त तिनं अभिनय क्षेत्रात काहीच केलंल नाही. बिग बॉसच्या पहिल्या विकमध्ये ती आऊट झाली. त्यानंतर कोरोना काळात उर्फीनं अशा विचित्र फॅशन स्टाइलनं सोशल मीडियावर आपला चाहता वर्ग निर्माण केला. आधी ती रिल्स मधून क्लोथिंग हॅक शेअर करायची त्यानंतर तिचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आणि थेट मुंबईच्या रस्त्यावरही तिनं विचित्र फॅशन स्टाइल दाखवायला सुरूवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *