अमेरिकेतून वडिलांच्या अस्थि घेऊन गावी आला, पण झालं असं की तिने…

अमेरिकेतून-वडिलांच्या-अस्थि-घेऊन-गावी-आला,-पण-झालं-असं-की-तिने…

अमेरिकेतून वडिलांच्या अस्थि घेऊन गावी आला, पण झालं असं की तिने…

Viral Story : निखिलच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते.संपूर्ण कुटुंब अमेरिकेत असतानाही निखिलने त्याच्या गावी येऊन अस्थि विसर्जन करण्याचे ठरवले होते

Updated: Jan 2, 2023, 07:07 PM IST

Viral Story : विदेशातील नागरिक भारतीय पुरुष किंवा महिलेच्या प्रेमात पडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. कधी कधी लग्नापर्यंत ही प्रकरणे पोहोचतात. मात्र या प्रकरणात भारतीय तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडला आणि दोघेही लग्नबंधनात अडकले. अगदी फिल्मी वाटणाऱ्या या लव्ह स्टोरीची सुरुवात पाहुनच अनेकांना धक्का बसला होता. निखिल आणि हिरावा यांची ही लव्ह स्टोरी आहे. वडिलांच्या निधनानंतर अस्थि विसर्जन करण्यासाठी निखिल अमेरिकेतून भारतात आला होता. मात्र यानंतर एका भेटीत तो हिरावाच्या प्रेमात पडला आणि ते दोघे एकत्र आले.

वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आला आणि प्रेमात पडला

कर्करोगामुळे वडील गमावल्यानंतर त्यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी निखिल भावासोबत अमेरिकेतून भारतात आला होता. कुटुंब अमेरिकेत राहत असले तरी वडिलांच्या अस्थी भारतात मूळ गावी विसर्जन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यासाठी निखिलने भावासह मूळ गाव गाठले. यानंतर दोघेही भाऊ गोव्यात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्रही होता.

क्लबमध्ये एन्ट्री आणि प्रेमाला सुरुवात

गोव्यात त्यांना एका क्लबमध्ये जायचं होतं. मात्र या क्लबमध्ये स्टॅग एन्ट्रीसाठी पैसे लागत होते. तर कपल एन्ट्री फ्री होती. 21 डिसेंबर 2010 रोजी तिथे हिरावा आपल्या दोन मैत्रिणींसह आली होती. यावेळी क्लबमध्ये एन्ट्री करताना दोघांनी एकमेकांची मदत घेतली. यानंतर दोन्ही ग्रुप क्लबमध्ये एकत्र गेले आणि त्यांची मैत्री झाली. हिरावा आणि निखिलने यावेळी एकत्र डान्सही केली. यावेळी निखिलने हिरावाकडे तिचा फोन नंबर मागितला मात्र त्यावेळी तिने तो दिला नाही. मात्र त्यांच्या मित्रांनी आपले नंबर एकमेकांना दिले. यामुळेच निखिलला हिरावाचा नंबर मिळाला आणि त्याने 2010 मध्ये 31 डिसेंबर रोजी हिरावाला नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा मेसेज पाठवला.

एका इंग्रजी वेबसाईट दिलेल्या वृत्तानुसार, हिरावाने गोव्याच्या त्या क्लबमधील डान्सच्यावेळेचा प्रसंग सांगितला. “मला आठवते की तो माझा हात धरून  डान्स फ्लोअरवर माझ्यासोबत नाचत होता. यावेळी मी फक्त त्याच्याकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे पाहत होता. यावेळी मला वाटले,  की त्याने माझा हात कायमचा धरावा. हे खरोखर एखाद्या चित्रपटासारखे वाटते, पण मला असेच वाटत होते,” असे हिरावाने म्हटलं.

यानंतर फेसबुकच्या माध्यमातूनही ते एकमेकांच्या जवळ आले. निखिलने यावेळी त्याने हिरावासोबत गोव्याच्या त्या क्लबमध्ये डान्स केलेल्या गाण्याचा स्टेटस ठेवला होता. यानंतर मेसेज, व्हिडीओ कॉल यावरुन त्यांचा संवाद वाढला. यानंतर निखिलने पुन्हा भारतात परतल्यानंतर हिरावाच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर हिरावा निखिलच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अमेरिकेला गेली. वर्षभरानंतर दोघांनीही लग्न केले आणि आता ते अमेरिकेत राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *