अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी पहाटचे सूर, कमला हॅरिस यांनी फोडले फटाके!

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : देशभरात दिवाळी सणाचा उत्साह आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीही व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी सण साजरा केला आहे.
आज व्हॉईट हाऊसमध्ये दिवाळीच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जो बिडेन आणि कमला हॅरिस हजर होत्या.
To everyone celebrating the Festival of Lights here in the United States and around the world, happy Diwali! pic.twitter.com/0DPlOaqhMO
— Vice President Kamala Harris (@VP) October 24, 2022
‘
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक हजर होते. यावेळी, अंधारावर उजेडाने मात करणार सण हा दिवाळी आहे, असं सांगत कमला हॅरिस यांनी सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बिडेन यांनीही भारतीयांचं कौतुक करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
#WATCH | US President Joe Biden, First lady Jill Biden and Vice-President Kamala Harris celebrate the festival of #Diwali at the White House pic.twitter.com/WPOOYSW2zo
— ANI (@ANI) October 24, 2022
विशेष म्हणजे, या वेळी बॉलिवूडच्या गाण्यावर खास परफॉर्मन्सही पाहण्यास मिळाला. त्यानंतर हॅरिस यांच्या घराबाहेर फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली.
(वाचा – UK Crisis : पंतप्रधानपदाचा राजीनामा देणाऱ्या लिझ ट्रस यांना मिळणार कोट्यवधी रुपये, कारण…)
दरम्यान, दुसरीकडे इतिहासात पहिल्यांदा भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ऋषी सुनक यांची सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली.
सुनक यांना 190 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्याच वेळी, त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट 100 खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्याने शर्यतीतून बाहेर पडल्या.
(ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच मोदींकडून शुभेच्छा, या मुद्द्यांवर एकत्र काम करणार!)
पेनी मॉर्डंट यांनी ट्विटमध्ये जाहीर केले की त्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत आहे आणि यूकेचे पंतप्रधान म्हणून सुनक यांना पाठिंबा देत आहे. सुनक हे ब्रिटनचे 57 वे पंतप्रधान असतील. देशाचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती असतील. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान देखील आहेत. मात्र, देशाचे अर्थमंत्री असताना ते क्वचितच आपल्या धर्माबद्दल बोलले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.