अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणार

अमिताभ-बच्चन-यांचा-नातू-अगस्त्य-नंदा-हा-बाॅलिवूडमध्ये-धर्मेंद्र-यांच्यासोबत-काम-करणार

विशेष म्हणजे अगस्त्य नंदा हा चक्क पहिला चित्रपट हा धर्मेंद्र यांच्यासोबत करणार आहे.

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण लवकरच करणार आहे. विशेष म्हणजे 2023 मध्ये अगस्त्य याचे तब्बल दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातील एका चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा, शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर हे तिघेहीसोबतच दिसणार असून सुहाना खान आणि खुशी कपूर देखील या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. विशेष म्हणजे अगस्त्य नंदा हा चक्क पहिला चित्रपट हा धर्मेंद्र यांच्यासोबत करणार आहे.

आज धर्मेंद्र यांचा वाढदिवस आहे. 8 डिसेंबरला धर्मेंद्र हे 87 वर्षांचे झाले असून या खास प्रसंगी नव्या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आलीये. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांच्या चित्रपटात अभिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा डेब्यू करणार आहे.

अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू होत्या.

इक्कीस या चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा हा धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनातून प्रेरित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू महत्वाच्या भूमिकेत आहे.

जोया अख्तरच्या आर्चीज चित्रपटात देखील अगस्त्य नंदा महत्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटात सुहाना खान आणि खुशी कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.

आर्चीज या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आलाय. कारण या चित्रपटामधून तब्बल 3 स्टार किड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जात आहे. हा चित्रपट काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *