अपघातात Rishabh Pant चे प्राण वाचवणाऱ्याची महिन्याकाठीची कमाई फक्त इतकी

Rishabh pant Accident: एक साधा, सामान्य माणूस ऋषभ पंतच्या मदतीला धावून गेला. त्यांनी ऋषभला वेळेवर रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले.
डेहराडून: टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या कारला आज सकाळी भीषण अपघात झाला. दिल्ली-डेहराडून हाय वे वर रुडकीजवळ ऋषभची कार डिवायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने ऋषभ वेळ असतानाच, कारच्या बाहेर पडला. पंत या अपघातात गंभीर जखमी झालाय. ऋषभच्या जीवाला आता धोका नाहीय. ऋषभसाठी एका ड्रायव्हर देवदूत बनून धावला. तो अपघातानंतर पंतच्या जवळ पोहोचला. त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. हरियाणा रोडवेजच्या ड्रायव्हरने पंतच्या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
उत्तराखंड पोलिसांनी काय माहिती दिली?
ऋषभ दिल्लीहून उत्तराखंडला आपल्या घराच्या दिशेने निघाला होता. सकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी कार डिवायडरला धडकून पलटली. त्यानंतर कारमध्ये आग लागली. हरियाणा रोडवेजच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने फोन करुन आम्हाला या अपघाताची माहिती दिली. नारसल चेकपोस्टवरुन उत्तराखंडचे पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी ऋषभला रुग्णालयात नेलं. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले.
ड्रायव्हर मदतीला आला धावून
हरियाणा रोडवेजच्या बसेस याच मार्गावरुन धावतात. या बसवर काम करणाऱ्या ड्रायव्हर्सचा महिन्याकाठीचा पगार 20 हजार रुपये आहे. त्यांनी ऋषभला वेळेवर रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले. काही बातम्यांनुसार ड्रायव्हरच्या आधी काही युवक पंतजवळ पोहोचले होते. त्यांनी मदत करण्याऐवजी बॅगमधून पैसे काढले व पळून गेले.
एक्सीडेंट के तुरंत बाद अपने पैरों पर खड़े दिखे ऋषभ पंत। सर से खून निकल रहा था। महादेव ने मौत के मुंह से बचा लिया। भगवान जल्द स्वस्थ करें।#Rishabpant @RishabhPant17 pic.twitter.com/fFbpWAbfDb
— Shubham shukla (@ShubhamShuklaMP) December 30, 2022
अपघातानंतर पंत घाबरला नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत पुढच्या बाजूची काच फोडून कारच्या बाहेर पडला. पंतची कार वेगामध्ये होती. त्याचवेळी त्याचा डोळा लागला. गाडी डिवायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला जाऊन पलटली. पंत या दुर्घटनेनंतर घाबरला नाही. काच फोडून तो बाहेर आला. पंत कार बाहेर येताच आग लागली. पंतच्या या अपघातच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. अपघातानंतर तो किती गंभीर जखमी झाला होता, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.