अन् प्रसाद ओकचा बायकोने केला पोपट ; पाहा नेमक काय झालं

मुंबई, 3 जानेवारी : मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे प्रसाद अभिनयाशिवाय प्रसाद ओक दिग्दर्शनातही उत्तम कामगिरी करत आहे. प्रसाद ओक सोशल मीडियार नेहमी सक्रीय असतो. विशेषरून तो त्याच्या भन्नाट इन्स्टा रीलमुळे चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या पत्नीसोब नेहमीच सोशल मीडियावर धमाल करतान दिसतो. नुकताच प्रसाद ओकने एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रसादचा व्हिडिओ सुरू असतानाच प्रसादाच्या बायकोने त्याचा असा काही पोपट केला आहे की ज्यामुळे त्याची बोलतीच बंद झाली आहे.
प्रसाद ओकनं “वयाच्या मानानी” वगैरे असं काही नसतंच.या सगळ्या अंधश्रद्धा असतात 😜😜😜..असं म्हणत एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. प्रसाद ओक व्हिडिओमध्ये एक किस्सा सांगताना दिसत आहे. तो म्हणताना दिसत आहे की, काल एक सुंदर मुलगी मला भेटायला आली आणि म्हणाली काय दिसता तुम्ही….प्रसाद हे कौतुकानं सांगताना दिसत आहे. तितक्यात त्याच्य बायकोचा मागून आवाज येतो. ती त्याला म्हणते.. वयाच्या मानानी…यानंतर प्रसाद नाराज होऊन व्हिडिओ बंद करतो.
वाचा: ‘अमृता देशमुख माझ्या आयुष्यातील… ‘, घरातून बाहेर येताच प्रसाद जवादेचा खुलासा
प्रसादची बायको मंजिरी बिझनेस वूमन असून ती अनेक ब्रँडसोबत कोलॅबोरेशन देखील करत असते. मंजिरीनं प्रसादसोबत असिस्टंट डायरेक्टरचंही काम केलं आहे. मंजिरी देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक फोटो तसेच तिच्या कामाबद्दल माहिती ती शेअर करत असते.
. प्रसाद ओकने आजपर्यंत दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये व अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा चांगलाच गाजला.
तसेच त्याची प्रमुख भूमिका असलेल्या धर्मवीर सिनेमाने देखील बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला कमावला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.