अनंतशांती संस्थेला मराठा महासंघ कोरोणा योध्दा पुरस्कार प्रदान

कोल्हापूर

कोल्हापूर- सुभाष भोसले
अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांचे वतीने चौफुला येथे कोरोणा काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्थेसाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व वाळवे यांना दौंड तालुका मराठा महासंघ यांच्या मार्फत सामाजिक उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरविणेत आले संस्थेने सामाजिक शैक्षणिक .महिला सबलिकरण व इतर कोरोणा काळात मास्क सॕनिटाइजर अल्सेनिक अल्बंम गोळयाचे वाटप अशा अनेक कार्यात कोल्हापुर जिल्हयासह इतर जिल्हयामध्ये उल्लेखनीय कार्य केले .अनंतशांती संस्थेचा कार्याचा आढावा घेवुन त्यांना आखिल भारतीय मराठा महासंघामार्फत संस्थेला
आदर्श संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी हा पुरस्कार दौंड येथे स्विकारला.
कार्यक्रमाचे संयोजन मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुरशा आबा सोळसकर,युवक मराठा महासंघ अध्यक्ष विशाल कुंजीर,अँड अजित दोरगे,श्रीकांत जाधव,पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असो.चे अध्यक्ष सचिन गुंड ,मावळा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल दोरगे,स्वप्निल घोगरे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *