शांतीलाल शर्मा
पालम :- येथे भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने पालम शहरात दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यत शहरातील मंदिरा बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले गेल्या सहा महिण्यापासून बंद असलेले राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे तातडीने उघडावीत या मागणी करिता अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक ह.भ.प. नारायन महाराज पालमकर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण पालम येथिल धार्मिक स्थळा समोर करण्यात आले. यावेळी ह.भ.प. नारायण महाराज पालमकर यांनी ठाकरे सरकार विरोध निषेध व्यक्त केले संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद या काळ्या निर्णया विरोधात घोषणा देत मंदिर बंद, उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार असे घोषना देण्यात आल्या, रेष्टारंट सुरू झाले मात्र या सरकारने मंदिर बंद ठेवले ठाकरे सरकारने त्वरीत मंदिरे सुरू करावेत यासाठी शहरातील मंदिरा बाहेर धर्माचार्य, साधूसंत, वारकरी, संत महात्मे, फुल विकृते व छोटे व्यावसायीक व अनेक धार्मिक संघटना एकत्र येत अध्यात्मिक आघाडी भाजपाच्या नेतृत्वा खाली राज्यव्यापी उपोषण महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. यावेळी संयोजक ह.भ.प. नारायन महाराज पालमकर, लिंबाजीराव टोले, ह.भ.प. सखारामजी गडम, आबासाहेब गोधंळी, केशव महाराज कुलकर्णी, श्रीहरी लिंगायत, रावसाहेब मामा, भिमरावजी किरडे, सुभाषराव शिंदे आधी उपस्थित होते.