अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार नाहीच; मुख्यमंत्र्यांकडील खाती

अधिवेशनाआधी-मंत्रिमंडळ-विस्तार-नाहीच;-मुख्यमंत्र्यांकडील-खाती

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ महाराष्ट्र
  • Maharashtra Cabinet : अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच; मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचं तात्पुरतं वाटप, ‘या’ मंत्र्यांची खाती वाढली

Maharashtra Cabinet : अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच; मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचं तात्पुरतं वाटप, ‘या’ मंत्र्यांची खाती वाढली

Maharashtra Cabinet expansion : हिवाळी अधिवेशनाच्या (winter assembly session nagpur )आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maharashtra Cabinet expansion news cm eknath shinde temporary allocation of Ministry for the winter assembly session nagpur Maharashtra Cabinet : अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच; मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचं तात्पुरतं वाटप, 'या' मंत्र्यांची खाती वाढली

Maharashtra Cabinet expansion ( Image Source : PTI )

Maharashtra Cabinet expansion : हिवाळी अधिवेशनाच्या (winter assembly session nagpur )आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतःकडील खात्यांचे अधिवेशनासाठी तात्पुरते वाटप केलं आहे. मंत्रिमंडळातील पूर्वीच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde news) यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी अधिवेशन (Nagpur Adhiveshan) काळापुरती दिली आहे. 

 

मुख्यमंत्र्यांकडील खाती या मंत्र्यांकडे

मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची तात्पुरती जबाबदारी शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. पणन खातं दादाजी भुसे यांच्याकडे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय खातं संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलं आहे. मृदा व जलसंधारण खातं तानाजी सावंत यांच्याकडे देण्यात आलं आहे तर अल्पसंख्यांक विकास खातं अब्दुल सत्तार यांच्याकडे तात्पुरतं दिलं आहे. पर्यावरण आणि सामान्य प्रशासन मंत्रालयाची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी तात्पुरती संदिपन भुमरे यांना दिली आहे. तर माहिती व जनसंपर्क खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे दिली आहे. 

News Reels

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेली अधिकच्या खात्यांची जबाबदारी अधिवेशन काळापुरती सध्याच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडेच दिल्यानं आता अधिवेशनाआधी विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. 

नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी

राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री असे एकूण 20 मंत्री आहेत. तिकडे नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती. प्रशासनाने रवीभवन आणि नागभवन परिसरात तब्बल 40 बंगले मंत्र्यांसाठी तयार केले होते. राज्यात सध्या वीस मंत्री असताना चाळीस बंगले तयार केले जात असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं बोललं जात होतं. मात्र आता ही शक्यता मावळली आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळांचं वाटप होण्याचा अंदाज

मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळांचं वाटप होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महामंडळं देऊन काही आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्याची शिंदे आणि फडणवीसांची रणनीती असल्याची रणनीती असल्याची चर्चा रंगत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर संभाव्य नाराजी दूर करण्याचे हे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

ही बातमी देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion : रवीभवन, नागभवन परिसरात 40 बंगले मंत्र्यांसाठी तयार; हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा

Published at : 09 Dec 2022 11:32 PM (IST) Tags: maharashtra cabinet CM Eknath Shinde Cabinet expansion Maharashtra assembly session

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *