'अडल्ट डॉल' घेऊन मंदिरात पोहोचला तरुण, यामागचं कारण ऐकून बसेल धक्का

मुंबई 28 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कधी काय समोर येईल याचा नेम नाही, सध्या एक अशी माहिती समोर आली आहे. जी पाहून तुम्हाला धक्का बसेल. असं सांगितलं जात आहे की एक महिला व्यक्ती अडल्ट डॉल घेऊन एका मंदिरात पोहोचला. जे पाहून सगळेच थक्कं झाले. त्यानंतर त्याने या डॉल सोबत तेथे पोहोचण्याचं जे कारण दिलं ते तर त्याहून धक्कादायक आहे.
हे जग वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांनी भरलेलं आहे, त्यामुळे कोणती व्यक्ती कधी काय विचार करेल हे काही सांगता येणं शक्य नाही.
या अडल्ट किंवा सेक्स डॉलला मंदिरात घेऊन येण्यामागे देखील या व्यक्तीनं विचित्र कारण सांगितलं आहे. जे ऐकून तुम्हाला वाटेल की याला काही अर्थच नाही. पण या व्यक्तीसाठी मात्र ती फारच महत्वाची गोष्ट आहे.
हे ही पाहा : Viral Video : बसमध्ये जागा मिळवण्यासाठी तरुणीने लावली अशी युक्ती, पाहून थक्क व्हाल
या डॉलला मंदिरामध्ये घेऊन येण्यामागचं या व्यक्तीने कारण सांगितलं की त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे…. बसला ना धक्का? आपल्याला हे कारण पटलं नसलं तरी देखील या तरुणासाठी मात्र हे फारच महत्वाचं असल्याचं सांगितलं. या व्यक्तीच्या अशा कृत्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आले.
नक्की काय घडलं?
वास्तविक ही घटना म्यानमारमधील एका मंदिराची आहे. हे बौद्ध मंदिर आहे. या मंदिरात एक तरुण दोन सेक्स डॉल घेऊन पोहोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी मंदिरात अनेक लोक आधीच उपस्थित होते. या व्यक्तीने दोन्ही प्रौढ बाहुल्यांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला सगळ्यांच्या उपस्थीतीत या दोन्ही डॉलशी लग्न करायचं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीने संपूर्ण रितीरिवाजानुसार दोन्ही अडल्ट डॉलसोबत लग्न केलं. मात्र काही वेळाने जेव्हा लोकांना त्या व्यक्तीच्या कृत्याची माहिती मिळाली तेव्हा लोक संतापले. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्यामुळे याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. परंतू तोपर्यंत तो तरुण निघून गेला होता. ज्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला शोधून अटक केली आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार ही घटना गेल्या आठवड्यात घडली. दोन्ही बाहुल्यांची लांबी पाच फूट असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही बाहुल्या म्यानमारच्या पारंपारिक कपड्यात होत्या. दोघांच्याही डोक्यावर मुकुट देखील घालण्यात आले होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.