अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद, नेमका वाद काय? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

चेतन पाटील
Updated on: Dec 31, 2022 | 11:56 PM
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं अजित दादा म्हणालेत. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपनं तीव्र विरोध केलाय.
Image Credit source: tv9 marathi
नागपूर : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. तर आंदोलनंही सुरु झालीत. औरंगजेबनं छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची ऑफर दिली होती. पण संभाजी महाराजांनी तीव्र यातना सहन केल्या. मात्र त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. त्यामुळं संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं जातं. तर स्वराज्य रक्षक म्हणजे, सर्वांचं…मातृभूमीचं रक्षण करणारा.
छत्रपती संभाजी महाराजांवर नुकतीच एक मालिका निघाली होती. त्या मालिकेचं नावही स्वराज्य रक्षकच होतं. आणि महाराजांच्या भूमिकेत राष्ट्रवादीचेच खासदार अमोल कोल्हे होते.
पण राष्ट्रवादी किंवा अजितदादांचं म्हणण्याशी भाजप आणि शिंदे गट सहमत नाही. संभाजीराजेंनी स्वराज्याचं रक्षण करण्याबरोबरच, धर्माचंही रक्षण केलं. त्यामुळं संभाजीराजे धर्मवीरही होते, असं भाजपसह शिंदे गटाचं म्हणणंय.