अजित पवार म्हणाले संभाजी महाराज धर्मवीर नव्हते; संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्धसत्य…

अजित-पवार-म्हणाले-संभाजी-महाराज-धर्मवीर-नव्हते;-संभाजी-राजेंची-पहिली-प्रतिक्रिया;-म्हणाले,-अर्धसत्य…

अजित पवारांचं स्टेटमेंट चुकीचं. ते अर्ध सत्य बोलले. संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे. पण संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे साफ चुकीचं आहे.

अजित पवार म्हणाले संभाजी महाराज धर्मवीर नव्हते; संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्धसत्य...

अजित पवार म्हणाले संभाजी महाराज धर्मवीर नव्हते; संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्धसत्य…

Image Credit source: tv9 marathi

कोल्हापूर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे विधान केलं, त्याबाबत कोणता संदर्भ दिला मला माहीत नाही. पण अजितदादा बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच. पण ते धर्मवीरही होते. त्याबाबतचे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असं माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. संभाजी छत्रपती पत्रकार परिषदेत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलं. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचंही रक्षण केलं हे कोणीही नाकारू शकत नाही.

म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

संभाजी महाराज धर्मवीर होते. त्याबाबतचे अनेक पुरावे आहेत. संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत. धर्माचे रक्षक आहेत. धर्मवीर असल्याचे हे पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केलं. ते त्यांनीच सांगावं.

कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवारांचं स्टेटमेंट चुकीचं. ते अर्ध सत्य बोलले. संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे. पण संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे साफ चुकीचं आहे. संभाजी महाराज धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सभागृहात बोललेल्या विधानाला अधिकृतपणा येतो. हाऊसच्या बाहेर काहीही बोललं जातं. हाऊसमध्ये अभ्यास करूनच बोलावं लागतं. मग कोणताही विषय असो. माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती असेल तुम्ही जे काही कोट करता… तुम्ही आताचा कालखंड पाहून 300 वर्ष अगोदर जाता. हे बरोबर नाही, असं ते म्हणाले.

इतिहासकारांनी जे मांडलं ते वाचलं पाहिजे. आपल्याकडे मोठा इतिहास आहे. तुम्ही विकृत बोलून जाता. वाद निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही समाजासाठी काय करायचं ते करा. पुण्यात संभाजी महाराजांचं स्मारक करणार होता, त्यावर बोला. किती फंड आला आणि गेला त्यावर बोला. बाकीचे वाद का करता? फक्त संभाजी महाराज धर्मवीर होते ते म्हणणंही चुकीचं आहे. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *