अजस्त्र जहाजाच्या ब्लेडवर बसून 11 दिवस उपाशीपोटी प्रवास, एका फोटोने जगभरात खळबळ

अजस्त्र-जहाजाच्या-ब्लेडवर-बसून-11-दिवस-उपाशीपोटी-प्रवास,-एका-फोटोने-जगभरात-खळबळ

माद्रिद, 29 नोव्हेंबर : एखाद्या बेटावर किंवा जंगलात उपाशीपोटी जीव वाचवलेल्या लोकांची कहाणी तुम्ही वाचली असेल. पण, अथांग समुद्रात एका आक्राळविक्राळ जहाजाच्या ब्लेडवर बसून प्रवास करणाऱ्या लोकांची गोष्ट पहिल्यांदाच वाचत असाल. 11 दिवस उपाशी आणि तहानलेल्या समुद्रात घालवल्यानंतर स्पेनच्या कोस्टगार्डने तिघांना वाचवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मोठ्या जहाजात लपून बसलेले हे सर्व लोक नायजेरियातील लागोस सोडून कॅनरी बेटांवर पोहोचले. द गार्डियनमधील वृत्तानुसार, जेव्हा या सर्वांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यांच्यात डिहायड्रेशन आणि हायपोथर्मियाची लक्षणे होती, त्यानंतर त्यांना ताबडतोब उपचारासाठी बेटावरील रुग्णालयात हलवण्यात आले.

Salvamento Maritimo नावाच्या युजरने हे छायाचित्र सोमवारी ट्विटरवर पोस्ट केले. ऑइल आणि केमिकल टँकर अलिथिनी II च्या वल्ह्यावर लपलेले तीन प्रवासी दाखवण्यात आले आहेत.

या फोटोला एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. ‘आज दुपारी, सल्वामार नुनकीने अल्थिनी II जहाजाच्या रडर ब्लेडवरील तीन प्रवाशांची सुटका केली. जे लास पालमास बंदरात नांगरलेल्या  अवस्थेत होते. त्यांना बंदरात पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वाचा – ट्विटरवर कामुक फोटो, पॉर्न लिंक्सचा भरमार! आंदोलन दडपण्यासाठी चीनकडून नवी युक्ती?

अल जझीराने वृत्त दिले, की तीन स्थलांतरित प्रवासी जहाजाच्या रडर ब्लेडवर बसले होते, ज्यांचे पाय अटलांटिक महासागराच्या काही फूट वर होते. द गार्जियनने लिहले की, माल्टीज ध्वजांकित अलिथिनी II हे जहाज समुद्री रहदारीनुसार लागोस, नायजेरिया येथून 11 दिवसांच्या प्रवासानंतर सोमवारी दुपारी ग्रॅन कॅनरियातील लास पालमास येथे पोहोचले. या वेबसाईटने पुढे म्हटले आहे की, भूमध्यसागरीय मार्गावरील तपासणी कडक केल्यानंतर 2021 च्या अखेरीपासून उत्तर आफ्रिकेतून कॅनरीपर्यंत स्थलांतरितांचे धोकादायक क्रॉसिंग नाटकीयरित्या वाढले आहे.

सोशल मीडियावर चर्चा

हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही काळातच जगभरात व्हायरल झाला आहे. यामुळे स्थलातरितांचे दाहक वास्तव समोर आलं आहे. यावर सोशल मीडियावर चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. नागरिकांना जगण्यासाठी अशा प्रकारचा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मानवाधिकार संघटनाही यावर आक्रमक भूमिका घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *