अखेर निम्न तेरणा धरणातून जलसाठ्याचा विसर्ग

लातूर

औसा :ज्ञानेश्वर सूर्यवंशी

लातूर उस्मानाबाद जिल्हा सीमेलगत असलेल्या तेरणा नदीवरील प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून जलसाठय़ाने भरला नव्हता .पण प्रथमच दि:१३:१०:२०२० रोजी महाराष्ट्रात आलेल्या हवेच्या कमी दाबामुळे होणाऱया संततधार पावसामुळे धरणसाठ्यात पाण्याची वाढ होऊन तो शंभर टक्के भरला .त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन प्रवाहा कडील गावांना सतर्कतेचा इशारा देत काल अखेर धरणाचे दरवाजे उघडे करून अधिकच्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला .कालच्या पावसामुळे पन्नास टक्क्याहून अधिक शेतकर्यांनी काढलेल्या शेतीमालाचे नुकसान झाले. असून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *