अखिल भारतीय ओबीसी संघटनेची मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

सांगली

कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते.

अखिल भारतीय ओबीसी संघटनेची कडेपूर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये २५ तारखेला सांगली येथे घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी ओबीसी संघटनेचे सोनार समाजाचे जिल्हाअध्यक्ष सुहास पंडित, शिंपी समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष मुळे, कडेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनिल पवार, कडेपूर सोसायटीचे व्हा. चेअरमन मारुती माळी, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब जाधव, निलेश माळी, सचिन सलगर, अजमुद्दीन मुजावर, विजय सुतार, दिपक परदेशी, महादेव रासकर, परशुराम कुंभार, संपत जाधव, धनाजी काबुगडे, सुरेश भिंगारे, प्रल्हाद माळी यांचेसह सर्व समाजाचे मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी 25 तारखेला सांगली येथे ओबीसी मेळाव्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्या अनुषंगाने विविध विषयांच्या वरती चर्चा करण्यात आली. ओबीसींना कर्ज मंजुरी व ओबीसींच्या अन्य मागण्यांबाबत यावेळी अखिल भारतीय ओबीसी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष मधुकर जंगम यानी माहिती दिली. सर्वांनी एकजूट करून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *