अक्षयानं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली…

अक्षयानं-शेअर-केला-खास-व्हिडीओ;-म्हणाली…

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक &nbsp/ बॉलीवूड – bollywood news
  • Akshaya Deodhar: लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, ‘मी तयार नव्हते’

Akshaya Deodhar: लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, ‘मी तयार नव्हते’

अक्षया (Akshaya Deodhar) आणि हार्दिक (Hardeek Joshi) यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. यानिमित्तानं अक्षयानं एक खास व्हिडीओ शेअर केला.

Akshaya Deodhar and Hardeek Joshi one month wedding anniversary Akshaya Deodhar: लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, 'मी तयार नव्हते'

hardeek joshi, akshaya deodhar

Akshaya Deodhar:  ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेत राणादा ही भूमिका साकारणारा हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि  राणादा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. यानिमित्तानं अक्षयानं एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अक्षयानं तिच्या लग्नाच्या निर्ययाबाबत सांगितलं.

काय म्हणाली अक्षया? 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की,अक्षय तिच्या लग्नाच्या निर्णयाबाबत तसेच ती हार्दिकनं तिला केलेल्या प्रपोजबाबत सांगत आहे. ती म्हणते, ‘लोक काय विचार करतात? कोणी चिडलं आहे का? हे मला पटकन कळतं. त्यामुळे तो काय विचारण आहे? त्याला काय वाटतंय? हे मला कळत होतं. आता तो लग्नासाठी विचारेल, असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी त्या निर्णयसाठी तयार नव्हते. मला उत्तर द्यायला वेळ लागला. पण मला माहित होतं मी होच म्हणणार आहे.’ 

अक्षयाची पोस्ट: 

live reels News Reels

लाल रंगाची नऊवारी साडी, गळ्यात ठुशी, काळ्या मण्यांनी भरलेलं मंगळसुत्र, हिरव्या बांगड्या, मोत्याची नथ असा अक्षयाचा लग्नातला लूक होता. तर  हार्दिकने लाल रंगाचं धोतर आणि क्रिम रंगाचा कुर्ता परिधान केला होता.  ‘तुझ्यात जीव रंगला’ या या मालिकेमुळे हार्दिक आणि अक्षयाला विशेष लोकप्रियता मिळाली. 

हार्दिकचा आगामी चित्रपट
हार्दिक हा ‘हर हर महादेव’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हार्दिकच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हार्दिक हा या चित्रपटात  मल्हारी ही भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 3 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Published at : 03 Jan 2023 11:58 AM (IST) Tags: social media Akshaya Deodhar hardeek joshi ENTERTAINMENT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *